शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान | भातसा कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया | Lokmat News

2021-09-13 0

भातसा धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर आवरे गावाजवळ धरणाच्या डावा तीर कालव्याला मोठे भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तर आवरे परिसरातील शेतीतील भातशेती, काकडी, भेंडी, वांगी, वेलवर्गातील पिके पुरती वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कालव्याचे पाणी पूर्ण वेगाने वाहून गेल्याने जमिनीची मोठय़ा प्रमाणात धूप होऊन शेतक-यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.भातसा धरणाच्या निर्मितीनंतर सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून ३५ वर्षापूर्वी कालव्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु, या कालव्याची वेळोवेळी दुरूस्तीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याने कालव्याला भगदाड पडून मोठय़ा वेगाने शेतात पाणी वाहून जाण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires